गुगल फ्री वायफायने जोडले गेले ४०० वे रेल्वेस्टेशन


गुगलने भारतातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी आखलेला सार्वजनिक वायफाय कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ४०० रेल्वे स्थानके निवडली गेली होती त्यातील शेवटचे म्हणजे ४०० वे स्थानक आसामचे दिब्रुगड होते. या स्थानकावर गुरुवारी फ्री वायफाय सेवा सुरु झाली. या मोहिमेसाठी गुगलने रेलटेलची मदत घेतली होती. २०१६ मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमानुसार हे अभियान राबविले गेले.

गुगलने रेल्वेचा रेलटेलच्या मदतीने ४०० रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा पुरवून कोट्यावधी भारतीयांना जोडण्याची मोहीम हाती घेतली होती. रेलटेल हा रेल्वेचा तंत्रज्ञान विभाग आहे. या मोहिमेत पहिल्या वर्षात देशातील सर्वाधिक वर्दळीच्या १०० स्टेशनवर फ्री वायफाय सेवा दिली गेली होती. यात पहिली ३० मिनिटे युजरला वायफाय मोफत मिळते आणि त्यात ३५० जीबी डेटा वापरता येतो.

Leave a Comment