बेन्टलेने भारतात आणली ४ कोटी रु.किमतीची बेटाएगा व्ही ८


बेन्टलेने भारतात नवी बेटाएगा व्ही ८ कार सादर केली असून तिची एक्स शोरूम किंमत आहे ३ कोटी ७८ लाख रुपये. ही कार मागणीनुसार मिळणार असून एक्स्चेंज रेट नुसार तिच्या किमतीत बदल होणार आहे.

या कारला ट्वीन टर्बोचार्ज व्ही ८ पेट्रोल इंजिन दिले गेले असून ० ते १०० किमीचा वेग ती ४.५ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे तशी २९० किमी. याच मॉडेलचे व्ही १२ व्हेरीयंट उपलब्ध आहे. हि कार ० ते १०० चा वेग ४.१ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे तशी ३०१ किली. कंपनीचा दावा आहे कि एकदा कार टँक फुल केला तर ती ७४६ किमीचे अंतर कापते. कारला ८५ लिटरची टाकी दिली गेली आहे.

कारचे दरवाजे आतून ग्लोस कार्बन फायबर ट्रीम फिनिशचे असून सेंटर कन्सोल, डॅशबोर्ड नव्या लेदर ने सजविले गेले आहेत. व्ही १२ व्हेरीयंट ची किंमत व्ही ८ पेक्षा ३४ लाखाने जास्त आहे.