देशातील पहिले व्हेईकल स्क्रॅपिंग व रिसायकलिंग युनिट सुरु


देशाच्या वाहन उद्योगातील अग्रणी कंपनी महिंद्र एक्सेलोने सरकारी कंपनी एमएसटीसीच्या भागीदारीत देशातील पहिले ऑटोमेटेड व ऑर्गनाईज्ड व्हेईकल स्क्रॅपिंग व रिसायकलिंग सेंटर ग्रेटर नॉयडा येथे सुरु केले आहे. यामुळे जुनी कार भंगारात योग्य किमतीला विकण्याची सुविधा कार मालकांना उपलब्ध झाली आहे. सीईआरओ या नावाने हे सेंटर सुरु केले गेले आहे. सध्या येथे केवळ दिल्ली शहरात सेवा दिली जाणार असली तरी देशभर अशी केंद्रे लवकरच सुरु होत आहेत.

या सेवेचा फायदा घेताना कार मालकाला आपल्या वाहनाची माहिती, ब्रांड, मॉडेल, रजिस्ट्रेशन वर्ष, सध्याची स्थिती कंपनीला कळवावी लागेल. त्यानंतर दिलेल्या वेळेला कंपनीचे लोक येऊन गाडी व कागदपत्रे तपासून बेस्ट ऑफर देतील आणि सेवा हवी असल्यास तसा करार करणार आहेत. गाडीचे डीरजिस्ट्रेशन करून दिले जाणार आहे. तसे प्रमाणपत्र मालकाला दिले जाईल.

या सेंटरसाठी अत्याधुनिक यंत्रे बसविली गेली आहेत. कार मालक गाडी देणगी म्हणूनही देऊ शकणार आहेत. त्यातून मिळालेला पैसा वंचित मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महिंद्रच्याच संस्थेला दिला जाणार आहे. देण्गीदारला करबचतीसाठी ८० सी प्रमाणपत्र दिले जाईल असे सांगितले गेले आहे.

Leave a Comment