अबब ! ४४५ कोटींना विकली गेली हे फेरारी


विंटेज कार्सची जगात काही वेगळीच क्रेझ आहे. त्यात या कार मर्सिडीज, रोल्स रॉईस किंवा फेरारी सारख्या महागड्या कार्स असतील तर बातच वेगळी. धनिक लोक म्हणाल त्या किमतीला या गाड्या खरेदी करतात. १९६३ साली बनलेली फेरारी २५० जीटीओ अशीच एका अमेरिकन बिझिनेसमन ने तब्बल ४४५ कोटी खर्चून लिलावात खरेदी केली. याच मॉडेलची एक कार काही वर्षपूर्वी ३८० कोटींना विकले गेले होते मात्र या गाडीने तो विक्रमही मोडीत काढला.

या कारच्या खरेदीदाराचे नाव डेव्हिड मॅक्नील असून तो वेदरटेक या कंपनीचा मालक आहे. त्याने खरेदी केलेली फेरारी होळी ग्रेल नावाने प्रसिद्ध असून तिचे उत्पादन झाल्यावर पहिल्याच वर्षी या कारने जगातील नामांकित अशी टूर द फ्रांसहि रेस जिंकली होती. या मॉडेलची १९६२ ते ६४ या काळात फक्त ३२ युनिट बनविली गेली होती.

Leave a Comment