खजूर पिकवून शेतकरी करताहेत लाखोंची कमाई


एके काळी इराणची मक्तेदारी असलेल्या खजुराचे उत्पादन आता इजिप्त, लिबिया, पाकिस्तान, युएसए, सुदान, सौदीत होऊ लागले असून त्यात भारतानेही आघाडी घेतली आहे. भारत हा आत्तापर्यंत खजुराचा सर्वात मोठा आयातदार देश होता मात्र आता भारतातील शेतकरी खजुर शेती करत असून त्यातून वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत.

राजस्थानच्या बाडमेर तसेच विदर्भात काही ठिकाणी खजूर पिकविला जात आहे. नारळाप्रमाणे खजूर झाडहि कल्पतरू मानले जाते. खजुरापासून लोणची, ज्यूस, स्टार्च, मद्य बनविता येते तसेच खजूर अत्यंत पौष्टिक आहे. तो नुस्ताहि खाल्ला जातो. खजुराच्या बियांपासून कोंबड्यासाठी अन्न बनते तसेच झाडाच्या पानापासून टोपल्या, केरसुण्या, दोर, कागद बनविला जातो.

बाडमेर मधील शेतकऱ्यांनी या शेतीतून वर्षाला साडेतीन लाखांची कमाई केली आहे तर विदर्भात थांगवळ यांनी अशीच कमाई करून आता खजूर २५ एकर जागेत लावला आहे. हे झाड साधारण ५० वर्षे जगते. ५-६ वर्षानंतर फळे येतात आणि वर्षे वाढतील तसे उत्पादन वाढत जाते. १० वर्षे जुने झाड ५० ते ६० किलो खजूर देते. याची सेंद्रिय शेती करता येते आणि एकदा लागवड करताना रोपांचा खर्च केला कि पुन्हा हा खर्च करावा लागत नाही. खजूर बागेत अंतरपिके घेता येतात आणि उत्पन्न वाढविता येते.

Leave a Comment