डॉन दाउद इब्राहीमला कॅमेऱ्यात कैद करणारे भवनसिंग


मुंबई साखळी बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीमचे फारसे फोटो पाह्यला मिळत नाहीत. आज गुगलवर त्याचे जे फोटो सर्च केल्यावर सर्वाधिक संख्येने दिसतात ते गॉगल लावलेला, सिगरेट ओढणारा, दाट काळ्या मिशा असलेला, पिवळ्या टीशर्ट मधल्या दाऊदचे. हे फोटो कुणी आणि कधी काढले याची माहिती अनेकांना नाही. हे फोटो १९९३ च्या बॉम्बस्फोटापूर्वीचे आणि शारजा मध्ये टिपलेले आहेत आणि त्या फोटोग्राफरचे नाव आहे भवनसिंग. आज भावसिंग ८० वर्षाचे आहेत आणि त्या काळी ते इंडिया टुडे मध्ये फोटोजर्नालीस्ट म्हणून काम करत होते. हे फोटो त्यांनी कसे टिपले याची हकीकत मोठी मनोरंजक आहे.

१९८५ साली शारजा येथे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जात होता तेव्हा भवनसिंग या सामन्याचे फोटो काढण्यासाठी तेथे होते. स्टेडीयम मध्ये फिरत असताना कानावर पडलेल्या काही शब्दांनी ते एकदम सावध झाले. व्हीआयपी स्टँड मध्ये त्यांच्या कानावर नाव पडले दाऊद इब्राहीम. त्यावेळेपर्यंत दाऊदचा एकही फोटो प्रसिद्ध झाला नव्हता आणि भवनसिंग यांनी त्याला पाहिलेलेही नव्हते. एका क्षणात त्याच्यातला पत्रकार जागा झाला आणि त्यांनी त्वरीत एक कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला आणि दुसरा गळ्यात अडकवून आसपास पाहून त्यात महत्वाचा वाटेल अश्या व्यक्तीचा फोटो काढण्याची तयारी केली पण त्यांना कॅमेरा बंद असे सुनावले गेले. दाऊद भोवती असलेल्या त्याच्या टोळक्यात छोटा राजनहि होता.


भवनसिंग दाऊदकडे पाहू लागले तेव्हा त्याने फोटो काढू दे असे त्याच्या पित्त्यांना सांगितले मात्र भवनसिंग यांनी फटाफट पाच फोटो काढले. हा क्रिकेट सामना भारताने गमावला पण भवनसिंग यांना चक्क लॉटरी लागली.

भारतात परतल्यावर जेव्हा भवनसिंग यांनी हे फोटो अरुण पुरी यांना दाखविले तेव्हा ते आश्चर्याने म्हणाले तुला हे फोटो कुठे मिळाले? इंडिया टुडेतील त्यांचे बाकीचे सहकारीहि थक्क झाले होते. या भवनसिंग यांना एकाच मोठे समाधान होते, ते म्हणजे आपण ज्याचे फोटो दाऊद म्हणून काढले तो दाऊदचा निघाला. अन्यथा त्याच्या करियरवर चुकीचा फोटो काढल्याचा कायमचा ठप्पा बसला असता.

Leave a Comment