आली रॉयल एन्फिल्डची सर्वात तेज लॉकस्टॉक बाईक


एकापेक्षा एक सरस बुलेट बाईक बनविणाऱ्या रॉयल एन्फिल्डने जगातील सर्वात महाग आणि तेज बाईक लॉकस्टॉक नावाने सादर केली असून या कस्टमाइज बाईकची किंमत आहे १२.२ कोटी. हि बाईक लंडन मध्ये सादर केली गेली आहे. या बाईकला ६५० सीसीचेच इंजिन असले तरी ते काँटीनेंटल लिटी ६५० ट्वीन इंजिनपेक्षा अधिक सरस आहे. या बाईकला ६ स्पीड गिअरबॉक्स दिला गेला आहे.


नवी चासी, रीडीझाईन केलेले सिंगल हँडल बार, ड्रोप बार टाईप हँडलबार बोर्ड ट्रॅक मोटरसायकलपासून प्रेरणा घेऊन केले आहेत. हेडलँप काऊल, फ्रंड फेंडर कार्बन फायबरपासून बनविले गेल्याने गाडीचे वजन कमी झाले आहे. टॉप फ्युअल टँक दोन कटआउट मध्ये असून डाव्या भागात ५.४० कॅरेट हिऱ्याची रिंग दिली गेली आहे. सिंगल सीट असल्याने रिअर सस्पेन्शन नाही. एक्स्ट्रा बुस्ट साठी नायट्रॉक्स सिलिंडर इंजिनाच्या मागे लावला गेला आहे. बाईकचे टायर खूपच रुंद आहेत.

बाईकच्या वेल्डिंग, बिटिंग पासून पॉलीश पर्यंत सर्व काम हाताने केले गेले आहे. रॉयल एन्फिल्डची सर्वात वेगवान बाईक असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment