चार मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण


मोदी सरकारने बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी लवकरच मोठे पाउल टाकण्यासाठी काम सुरु केले असून चार सरकारी बँकांचे विलीनीकरण करून एक मोठी बँक स्थापन करण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयडीबीआय, बँक ऑफ बरोडा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या त्या चार बँका आहेत. या बँकांच्या विलीनीकरणातून जी एक बँक तयार होईल ती स्टेट बँकेनंतरची देशातील दुसरी मोठी बँक बनेल आणि तिची मालमत्ता असेल १६.५८ लाख कोटी.

आर्थिक वर्ष २०१८ मध्ये या चारी बँकांचा तोटा २१६४६ हजार कोटींवर गेला आहे. विलिनीकरणामुळे बँकेची स्थिती सुधारेल. स्टेट बँकेत ज्याप्रमाणे तिच्या सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले त्याच पद्धतीने हे विलीनीकरण होईल. आयडीबीआयच्या विलीनीकरणाबाबत मोदी सरकार अधिक आग्रही आहे कारण या बँकेत सरकारचे ५१ टक्के भागीदारी असून हा हिस्सा विक्री करून सरकार १० हजार कोटी रुपये मिळवेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment