अखेर भारतीय रस्त्यांवर धावणार बजाजची क्युट


सतत सहा वर्षे सरकारी लालफितीत अडकलेल्या बजाजच्या क्युट या क्वाड्रीसायकल ला व्यावसायिक स्वरुपात धावण्याचा मार्ग मोकळा होताना नजरेस येत असून रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने या गाडीचा क्वाड्रीसायकल कॅटेगरीत समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल असे समजते.

ही बहुगुणी गाडी भारतीय रस्त्यांवर आली कि वाहन उद्योगाला नवीन वळण मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रस्ते महामार्ग मंत्रालयाने ज्या कॅटेगरीमध्ये या गाडीला परवानगी दिली आहे त्यात सध्या फक्त क्युटचाच समावेश आहे. २०१२ च्या दिल्लीत झालेल्या ऑटो शो मध्ये हि कार सादर केली गेली होती. या कारचे वजन कमी असल्याने इंधन कमी लागते आणि ती सहज वळविता येते.

या छोटेखानी कारला परदेशात यापूर्वीच लोकप्रियता मिळाली आहे. देशातील हि पहिली ग्रीन कार असेल कारण यातून होणारे कार्बन उत्सर्जन खूपच कमी आहे. या कारला २१६.६ सीसीचे पेट्रोल इंजिन आहे तसेच ती सीएनजी आणि एलपीजी व्हेरीयंट मध्येही उपलब्ध आहे. ७० किमी वेगाने ती धावू शकते आणि एक लिटर पेट्रोल मध्ये ३६ किमी जाते. तिची भारतातील किंमत साधारण १ लाख २८ हजार असेल असे समजते.

Leave a Comment