व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकसाठी भरावा लागणार रोज ३ रुपये ३५ पैसे टॅक्स !


युगांडा : आजच्या शतकाची प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ओळख असल्यामुळे आज इंटरनेटशिवाय आपले पानही हलत नाही. मोबाईलवर सोशल मीडियावर अपडेट्स पाहून अनेकांची दिवसाची सुरूवात होतो. पण आता या सोशल मीडियाच्या वापरावर टॅक्स भरावा लागला तर? आता ०.०५ डॉलर म्हणजेच ३ रूपये ३५ पैसे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपसारख्या अ‍ॅप्सच्या वापरावर टॅक्स भरावा लागणार आहे.

सोशल मीडियाच्या वापरावर टॅक्स भरावा लागणार हा निर्णय युगांडामध्ये घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या वापरावर युगांडा सरकारने टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा १ जुलैपासून अस्तित्त्वात येणार आहे. पण त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल? युजर्सचा वापर कसा तपासला जाईल? टॅक्स कुठे भरायचा आहे? याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे.

या कायद्याचे युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवनी यांनी समर्थन केल्यामुळे सोशल मीडियावर विनाकारण वाढणारी गॉसिप्स आणि अफवांचे प्रकार रोखायला मदत होईल असे त्यांचे मत आहे. युगांडाच्या अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हा वाढीव टॅक्स देशावरील आर्थिक कर्ज कमी करण्यासाठी लावण्यात आला आहे. मोबाईल सिम कार्ड्सच्या रजिसट्रेशनवरूनदेखील युगांडा सरकार वादात आहे.

२.३ कोटी मोबाईल सब्सक्रायबर्स युगांडामध्ये असून यामध्ये १.७ कोटी युजर्स इंटरनेटचा वापर करतात. सोशल मीडिया आणि सायबर क्राईम यावरून भारतामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले नसले तरीही हा नियम सध्या भारतीयांसाठी नाही. सरकारची इच्छा असेल तर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशाप्रकारचा टॅक्स लावणे फार फायदेशीर ठरत नाही. कारण समाजातील फार मोठा वर्ग सध्या इंटरनेटचा प्रामुख्याने वापर करतो. लोक विचार न करता मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करतात.

युगांडामध्ये २०१६साली राष्ट्रपतीच्या निवडीच्या मतदानावेळी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळेस खोट्या बातम्या पसरू नयेत या गोष्टीची खबरदारी घेण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे मुसेवनींनी सांगितले होते.

Leave a Comment