अबू मु- जगातले महागडे अँड्राईड अॅप


आज जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या अब्जावधीत आहे आणि करोडो युजर्स लाखो प्रकारची विविध अॅप वापरून त्याची अनेक कामे सोपी करत आहेत. यातील बहुसंख्य अॅप गुगल स्टोरमधून फ्री डाऊनलोड केली जातात कारण तशी सुविधा दिली गेली आहे. मात्र अँड्राईडचे पूर्वीच लाँच झालेले एक अॅप जगातील महागडे अॅप म्हणून प्रसिद्ध असून त्याची किंमत ऐकली तरी थक्क व्हायला होईल. या अॅपचे नाव आहे अबू मु.

२०१३ साली हे अॅप सर्वात महागडे म्हणून नोंदले गेले आहे आणि आजही हे अॅप ज्यांच्या स्मार्टफोन मध्ये आहे ते अतिश्रीमंत वर्गातील आहेत. इतकेच नव्हे तर हे अॅप श्रीमंतीचे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. मोबाईल बरोबर ते डाऊनलोड करून गिफ्ट करता येते. पण हे ऐऱ्यागैरयाचे काम नाही. या अॅप च्या सहा सिरीज आहेत आणि त्या सर्व एकाचवेळी खरेदी कराव्या लागतात. प्रत्येक सिरीज साठी २६ हजार रु. मोजावे लागतात म्हणजे एकूण १,५६,००० ला हे अॅप पडते.

या अॅपची खासियत म्हणजे ते मोबाईल स्क्रीनवर व्हिजीटचे काम करते. यात विविध परकारची मौल्यवान रत्ने असून त्यात दुर्मिळ ब्लॅक डायमंड, माणिक, पाचू, अमेथिस्ट, अॅक्वामरीन, पुष्कराज अशी रत्ने स्क्रीनवर दिसतात. हि रत्ने बाजारात महाग आहेत म्हणून हे अॅप महाग आहे असे समजते.

Leave a Comment