आकाश अंबांनीना खेळातही आहे रस


भारतातील धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी याचे सुपुत्र आकाश सध्या त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. आकाश यांच्या अन्य छंदाबद्दल फारशी माहिती मिडीयाला नाही मात्र आकाश यांना उत्तम व्यवसाय करण्याबरोबरच खेळांचेही चांगले ज्ञान आहे आणि शाळेत फुटबॉल संघाचे नेतृत्व त्यांनी पाच वर्षे केले आहे.

आकाश यांना क्रिकेट खूप आवडते आणि २००८ साली आयपीएल मधील मुंबई संघाचे किट तयार करण्यात त्यांनी विशेष रस घेतला होता. २००८ ते २०१७ या काळात आयपीएल मुंबई संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. आई नीता यांच्यासोबत टीम व्यवस्थापन बैठकांना ते उपस्थित असतात मात्र प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये त्याची उपस्थिती क्वचित दिसते याचे कारण त्यांना पडद्यामागे राहून काम काराने अधिक आवडते.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये त्यांनी ५ वर्षे फुटबॉल संघाची कप्तानी केली आहे. सध्या ते इंडिअन सुपर लीग आणि इंडिअन प्री लीग मध्ये मुख्य भूमिका पार पाडत आहेत.

Leave a Comment