या हॉटेलमध्ये हनीमून साजरा करणाऱ्या कपलला मिळणार ६७ लाख रुपये


जेरूसलेम : लग्नसराईचा मौसम दरवर्षी येतो त्यानंतर हनीमूनसाठी नवोदित दांपत्य देशविदेशात रवाना होतात. लाखो रुपये अशावेळी खर्च होत असतात. पण एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर तुम्ही हनीमूनला गेला आणि रिटर्न येताना एक, दोन हजार नाही तर ६७ लाख रुपये मिळाले तर ?

याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार एक असेही हॉटेल आहे जिथे हनीमून साजरा करणाऱ्या कपलला ६७ लाख रुपये आणि येण्याजाण्याचा खर्चही दिला जातो. ही मजेदार ऑफर इस्त्रायलच्या एका हॉटेलमध्ये काही नियम अटींसह ठेवण्यात आली आहे. दर ४ वर्षांनी राजधानी यरुशलेममधील येहूदा हॉटेल कपल्ससाठी एक मजेदार ऑफर घेऊन येते. चार वर्षांशी याचा काय संबंध ? असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. इस्त्रायलची भाषा हिब्रूनुसार लीप ईयर ज्या फेब्रुवारीच्या २९ ला असेल ते शुभ मानले जाते. लीप ईयरला हिब्रुमध्ये प्रेग्नेंट ईयर मानले जाते.

अशावेळी लीप ईयरमध्ये हॉटेल कपल्सला ऑफर देतात. कोणती महिला जर २९ फेब्रुवारीला गर्भवती राहिली तर तिला ९९,३०० डॉलर म्हणजेच ६७ लाख रुपये दिले जातील. यासोबतच येण्याजाण्याचा सर्व सुविधांसहित खर्च उचलला जातो. पण अजूनही हॉटेलची ही अट पूर्ण होत नाही. ही ऑफर २९ फेब्रुवारीला गर्भवती होणाऱ्या पहिल्या २ महिलांनाच लागू होते.

या सर्व प्रकारात पारदर्शकता आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातो. या ऑफरमध्ये डॉक्टरांची टीम सहभागी होणाऱ्या कपल्सची तपासणी करते. हॉटेलमध्ये येण्याआधीच महिला गर्भवती नाही ना ? किंवा २९ फेब्रुवारीला ती गर्भवती झाली की नाही ? याची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. पण हॉटेलला यापासून फायदा नक्की मिळतो. हा त्यांच्या हॉटेलच्या मार्केटींगचा एक भाग असल्यायामुळे फेब्रुवारीमध्ये हॉटेलला येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.