रॉयल एन्फिल्डचे इंडिअन आर्मीशी आहे ६३ वर्षांचे नाते


ब्रिटीश आर्मी प्रमाणेच रॉयल एन्फ़िल्डचे इंडिअन आर्मीशी असलेले नाते चांगले परिपक्व असून गेली ६३ वर्ष हे नाते जपले गेले आहे. आजही रॉयल एन्फिल्ड इंडिअन आर्मीला बाईकचा पुरवठा करत असून त्याचा एक कारखाना चेन्नई येथे आहे. गेल्या काही वर्षात या कंपनीने त्याच्या तंत्रज्ञानात बदल करून अनेक नवी फीचर्स सामील केली आहेत. त्यामुळे आजही हि दुचाकी भारतीय लष्कराची पहिली पसंती आहे.

रॉयल एन्फिल्डची नुकतीच लाँच झालेली पेगासास क्लासिक ५०० एडिशन लष्कराला दिली गेली आहे. २०११ मध्ये क्लासिक ५०० डेझर्ट स्टोर्म, २०१५ मध्ये लिमिटेड एडिशन क्लासिक लाँच केली गेली. २०१७ मध्ये क्लासिक ५०० स्टेल्थ ब्लॅक १४ गाड्या २६ मिनिटात विकल्या गेल्या होत्या कारण या गाड्या एनएसजी कमांडोनी वापरलेल्या होत्या त्याही देशात दहशतवादाविरोधी जागृती करण्यासाठी. पेगासास हे नाव ब्रिटीश पॅराट्रूपरची आठवण म्हणून दिले गेले होते. त्याचा वापर दुसऱ्या महायुद्धात केला गेला होता. पेगासासचे १००० युनिट बनविली गेली असून त्यातील २५० भारतात विकली जाणार आहेत.

Leave a Comment