अन्नछत्र चालवणाऱ्या धार्मिक स्थळांना परत मिळणार जीएसटी


नवी दिली – मोफत अन्नछत्र चालवणाऱ्या धार्मिक स्थळांना अन्न शिजवण्यासाठी घेण्यात आलेल्या वस्तूंचा जीएसटी परत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून केंद्र सरकारने यासाठी ३२५ कोटींची तरतूद केल्याची माहितीही समोर आली आहे. ही तरतूद २०१८ आणि २०१९ या दोन आर्थिक वर्षात केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हा जीएसटी सेवा भोज योजने अंतर्गत परत केला जाणार असल्याचे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भातील वृत्त मनीकंट्रोल डॉट कॉमने दिले आहे.

जी नियमावली या योजने अंतर्गत तयार करण्यात आली आहे, ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. अशा अनेक धार्मिक आणि समाजिक संस्था देशात आहेत लोकांसाठी ज्यांच्या तर्फे मोफत अन्नछत्र चालवण्यात येते. अशा संस्थांना तूप, साखर, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर लागत असतो. अशा वस्तूंवरचा जीएसटी परत करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय अशा संस्थांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा जीएसटी परत केला जाणार असल्यामुळे अशा संस्थांवरचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. गुरुद्वारांना या निर्णयामुळे मोठा फायदा होईल असेही केंद्राने म्हटले आहे.

Leave a Comment