गुगलने आणली नाव सांगणारी स्मार्ट डोअरबेल


घराची बेल वाजली आणि जाग्यावर बसल्या बसल्याच बाहेर कोण आलेय त्याच्या नावाचा पुकारा झाला तर किती सोयीचे असे तुम्हाला वाटत असेल तर अशी बेल जायंट सर्च इंजिन गुगलने बाजारात आणली असून या स्मार्टबेलची किंमत आहे २२९ पौंड. सध्या हि बेल फक्त अमेरिका आणि युके मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. नेस्ट हॅलो असे या बेलचे नामकरण केले गेले आहे.

या बेलमध्ये फेशियल रेक्गनिझेशन तंत्राचा वापर केला गेला आहे. दरवाजातील व्यक्तीने बेल वाजविली कि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड होतो आणि वायफाय कनेक्ट असल्याने आत कनेक्ट असलेल्या डीव्हाइसवर व्यक्ती दिसते. त्यात घरात गुगल असिस्टन्ट स्पीकर असेल तर संबंधित व्यक्तीचे नाव बेल सांगते. या बेलमध्ये रात्रीही काम करू शकेल असा वाईड अँगल कॅमेरा असून व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. यामुळे घरात बसून बाहेर आलेल्या व्यक्तीशी चॅट करता येते. घरात कुणी नसेल तरी हि बेल मालकाच्या स्मार्टफोन ला इंटरनेट कनेक्ट करता येते. त्यामुळे बेल दाबली कि मालकाला अॅलर्ट मिळतो. त्यावरून दार उघडायचे काय याचा निरोप देता येतो. यात मेसेज फीड करण्याची सुविधा आहे. गरज पडल्यास बेल स्वतः बाहेर आलेल्या व्यक्तीला उत्तर देऊ शकते.

Leave a Comment