जगात या फूडफेस्टिवलना होते पर्यटकांची गर्दी


जगात अनेकांना हिंडणे फिरण्याचा शौक असतो त्याला विविध पदार्थ खाण्याची जोड असेल तर हा आनंद द्विगुणित होतो. यामुळेच असेल पण अनेक देशात फूड फेस्टिव्हल भरविले जातात आणि त्यातील काही इतके प्रसिद्ध आहेत कि देशविदेशातील अनेक पर्यटक त्याच्या मुहूर्त साधून त्यात्या देशात जाऊन या पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यातील काही फेस्टिव्हलची ही माहिती.

पिझा फेस्टिव्हल नेपल्स – इटलीतील अतिसुंदर अश्या नेपल्स मध्ये हा फेस्टिव्हल दरवर्षी भरतो. पिझा प्रेमींसाठी ही कुंभमेल्यासारखी पर्वणी. या काळात ५ लाखहून अधिक पर्यटक येथे येतात. नेपल्सचा लांग्मार कॅरा हा भाग पिझा व्हिलेज मध्ये परिवर्तीत होतो. या काळात येथे १ लाखहून अधिक पिझा विकले जातात.


वाइल्ड फूड फेस्टिव्हल- न्यूझीलंड आणि आईसलंडच्या वेस्ट कोस्ट मध्ये मार्च महिन्यात हा उत्सव होतो. यात आपण कधी कल्पनाही करु शकणार नाही अश्या पदार्थ, प्राणी, कीटकांपासून खाद्यपदार्थ बनविले जातात. इतक्या प्रकारचे प्राणी माणूस खात असेल यावर आपला विश्वास बसत नाही.


ओनियन मार्केट स्वित्झर्लंड- कांद्यापासून बनविलेले असंख्य पदार्थ आणि त्याची देखणी सजावट हे या उत्सवाचे वैशिष्ट. देशातला हा सर्वात मोठा फेस्टिवल आहे. सकाळी ६ पासून त्याची सुरवात होते मात्र खवय्ये त्याअगोदरच खादाडीमध्ये मश्गुल झालेले असतात.


सलान डे चॉकलेट हा क्विटो एक्वडोर मध्ये साजरा होणारा फेस्टिवल. हा जगातला एकमेव चॉकलेट फेस्टिव्हल नाही मात्र वन ऑफ द बेस्ट नक्कीच आहे. जूनमध्ये हा उत्सव होतो आणि असंख्य प्रकारची ,विविध चवींची आणि आकाराची चॉकलेट येथे खवय्यांसाठी बनविली जातात.

Leave a Comment