शाओमीने सादर केले मी ८ आणि मी ८ एसई स्मार्टफोन


चीनी मोबाईल उत्पादक कंपनी शाओमी ने गुरुवारी त्यांच्या वार्षिक प्रोडक्ट लाँचिंगची संधी घेऊन दोन नवे स्मार्टफोन चीनी बाजारात उतरविले आहेत. मी ८ आणि मी ८ एसई अशी त्यांची नावे असून हे मिड रेंज फोन आहेत. दोन्ही फोनसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

मी ८ फोनला ६.२ इंची फुल एचडी प्लस अमोलेड स्क्रीन दिला गेला आहे आणि ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम अश्या दोन व्हेरीयंट सह आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. रिअरला डूअल कॅमेरा सेट आणि सेल्फी साठी २० एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. त्याच्या किमती नौक्रमे २८६०० आणि ३४८०० रुपये आहेत.

मी ८ एसई साठी डूअल सीम आहे. ५.८८ इंची एमोलेड फुल एचडी स्क्रीन, २.५ डी ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. ४ जीबी आणि ६ जीबी रॅम असे दोन व्हेरीयंट असून ६४ जीबी इंटर्नल मेमरी आहे. मायक्रोकार्डच्या सहाय्याने ती वाढविण्याची सुविधा आहे. याची किंमत अनुक्रमे १८९०० आणि २११०० रुपये आहे.

Leave a Comment