राजगिर मध्ये लपला आहे सोन्याचा अमूल्य खजिना


बिहारच्या नालंदा जिल्यातील एक छोटे गाव राजगिर. हा गावाचा इतिहास मोठा आहे. कारण मौर्य शासक बिबिसार याची हि राजधानी. त्याकाळी मगध साम्राज्य होते. त्याचा तो राजा. हिंदू पुराणानुसार हि कृशांचा मामा कंस याचा सासरा राजा जरासंघाची राजधानी. या ठिकाणी प्राचीन काळापासून राजे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सोने लपवून ठेवले असल्याचे संकेत मिळतात. भुयारातून हे सोने गुहांमध्ये खोल्या बांधून लपविले गेले असल्याचे मानले जाते मात्र आजपर्यंत अजून तरी त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. याला सोने भांडार गोफ असे म्हटले जाते.


बौद्ध काळातही असे सोने लपविले गेले आणि ते वैभरगिरी पहाडाच्या जवळपास गुहेत लपविले गेले असे सांगितले जाते. येथे बौद्ध धर्म संबंधित अनेक स्मारके आहेत. बिम्बिसार सम्राटाला येथेच बुद्धाने धर्मोपदेश केला होता. जरासंघ राजानेही याच प्रकारे सोने गुहातून ठेवले होते असे मानले जाते. या सोन्याचा शोध लागला तर भारत जगात सर्वाधिक सोने असलेला देश बनेल असे म्हणतात.


राजगिर पासून प्राचीन विद्यापीठ नालंदा अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी पुरातत्व विभागाकडून उत्खनन केले जात आहे. त्यात अनेक स्मारके मिळत आहेत. राजगिर जवळ उंच पहाडावर जैन धर्मियाचे एक सुंदर मंदिर असून याच पहाडावर शांती स्तूप बांधला गेला आहे. येथे जाण्यासाठी रोप वे ची सुविधा आहे.
Tons of gold is headen in capital of jarasangh, Rajgir

Leave a Comment