निलेकणी करणार अर्धी संपत्ती दान


इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन निलेकणी आणि त्याच्या पत्नी रोहिणी त्यांची अर्धी संपत्ती दान करणार असल्याचे समजते. बिल आणि मिलिंडा गेटस फौंडेशन, वॉरेन बफे यांनी सुरु केलेल्या गिव्हिंग प्लेज या सामाजिक उपक्रमात निलेकणी याच्यासह अन्य दोन भारतीय वंशाचे उद्योजक सामील झाले असून तेही त्याची निम्मी संपत्ती चॅरीटी साठी देणार आहेत.

गिव्हिंग प्लेज हे आपण स्वतः कमावलेल्या संपत्तीतील निम्मा वाटा सामाजिक कार्यासाठी देण्याची तयारी असलेल्या लोकांसाठी सुरु झालेली मोहीम असून त्यात संपत्ती दान करण्याची शपथ घ्यावी लागते. २०१० मध्ये अमेरिकेत याची ४० लोकांपासून सुरवात झाली आणि आज २२ देशातील १८३ धनाढ्य यात सामील झाले आहेत.

नंदन निलेइकनि एक स्टेप नावाची संस्था चालवितात त्यात २० कोटी मुलांना शिक्षण देण्यासाठी काम सुरु आहे तर रोहिणी निलेकणी अर्घ्यम संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून हि संस्था संपूर्ण भाटतात पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करते. निलेकणी याच्याबरोबरच अनिल व एलिसन भुसरी हे भुसरी बिझिनेस या सॉफटवेअर फर्मचे संस्थापक आहेत तर समशेर व शबिना वायाबील, बी.आर. शेट्टी व त्याच्या पत्नी चान्द्रकुमाई यांनीही त्याची अर्धी संपत्ती दान करण्याची शपथ घेतली आहे.

Leave a Comment