साडेचार हजार बुटजोडांची ही आहे करूण कहाणी


बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स मधील युरोपिअन युनियन कौन्सिल बिल्डींग समोर ४५०० बुटांचे जोड ठेवले गेले आहेत. आवाज नावाच्या सामाजिक संस्थेने अतिशय गंभीर विषयाकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे पाउल उचलले आहे. या बुट जोडामागची कहाणी कुणाही सहृदय माणसाला पाझर फोडेल अशी आहे. या जोड्यांचे मालक आता या जगात नाहीत. त्यात लहान मुलांपासून वयोवृद्ध आहेत तश्याच महिलाही आहेत. विशेष म्हणजे या लोकांना त्याचा कोणताही दोष नसताना मृत्यू स्वीकारावा लागला आहे.

हे जोडे प्रतिक आहेत त्या निष्पाप माणसांचे ज्यांना युद्धात मारले गेले आहे. या मृतात्म्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज संस्थेने हे जोडे सांभाळून ठेवले आहेत. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन मध्ये दीर्घकाळ जो संघर्ष सुरु आहे त्यात या माणसांचे प्राण गेले आहेत. इस्त्रायलने एकाचवेळी या ४५०० लोकांना ठार केले होते, त्याविरोधात आवाज संस्थेने जगव्यापी आंदोलन सुरु केले आहे.

यापुढेही जो निरपराध इस्त्रायल पॅलेस्टीन संघर्षात मारला जाईल त्याचे जोडे यात सामील केले जातील. गाझा पट्टीतील छोटासा भूभाग पॅलेस्टीनच्या वाटणीला आला असून इस्त्रायल विरोधी कार्यरत असलेली हमास हि दहशतवादी संघटना येथे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. १९४७ पासून हि लढाई सुरु आहे कारण तेव्हाच युरोपिअन युनियनने पॅलेस्टीनची विभागणी अरब आणि ज्यू राज्यात केली होती.

Leave a Comment