रामदेवबाबांचे किंभो अॅप घेणार व्हॉटस अपशी पंगा


योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजलीने सीम कार्ड पाठोपाठ बुधवारी किंभो नावाने नवे अॅप बाजारात आणले असून सध्या जगभरात टॉपवर असलेल्या फेसबुकच्या घेणार व्हॉटस अपशी ते पंगा घेणार आहे. पतंजलीने स्वदेशी समृद्धी सीम पाठोपाठ हे स्वदेशी अॅप सादर करून टेलिकॉम क्षेत्रात आपले पाउल भक्कम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

किंभो हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे तुम्ही कसे आहात? पतंजलीने टेलिकॉम व्यवसायात देशी बीएसएनएलच्या सहकार्याने पाउल टाकले आहे. सध्या हे अॅप पतंजली कर्मचारी वर्गापुरते मर्यादित असून लवकरच ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होत आहे. यात १४४ रु.चा रिचार्ज करून २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा,१०० एसएमएस मिळणार आहेत शिवाय पतंजली उत्पादने खरेदीवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय युजरला अडीच लाखाचा वैद्यकीय विमा आणि ५ लाखाचा आयुर्विमा दिला जाणार आहे.

किंभो अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करून घेता येईल तसेच व्हॉटस अपला हा स्वदेशी पर्याय आहे. याची टॅग लाईन अब भारत बोलेगा अशी आहे. रामदेवबाबा या अॅप विषयी बोलताना म्हणाले आम्ही आमच्या सर्व्हर अथवा क्लाउड वर युजर डेटा सेव केलेला यामुळे युजरच्या खासगी गोष्टी सुरक्षित राहणार आहेत. देशात सध्या व्हॉटस अपचे २० कोटी युजर असून या युजरना किंभोकडे वळविणे हाच या अॅप चा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment