या मंदिरातील थंडाव्याचे रहस्य आजही कायम


जगभरात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांच्या भोवती गुढतेचे वलय आहे. मग ती मंदिरे असतील, जुने महाल, टेकड्या, चर्च, जंगले असतील. भारतातही अशी अनेक स्थळे आहेत ज्यामागे काही कथा आहे. रहस्य आहे अथवा चमत्कार आहे. ओडीसा राज्याच्या टीतलगड गावी असलेले एक शिवमंदिर अश्याच अनोख्या रहस्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील रहस्याचे गूढ अनेक संशोधनानंतरही कायम आहे.

हे मंदिर शिवपार्वतीचे आहे आणि ते एका डोंगराच्या पायथ्याशी गुहेत आहे. याचे वैशिष्ट म्हणजे मंदिराबाहेर कितीही गर्मी असली तरी मंदिराचा गाभारा अतिशय थंड असतो. म्हणजे बाहेरचे तपमान ४० डिग्रीच्या वर असले तरी मंदिरातील गाभाऱ्यात इतकी थंडी असते कि पुजारी शाल किंवा गरम कपडा घालून पूजा करतात. गर्भग्रहातील या गारव्याचे गूढ कायम आहे. असे सांगतात कि या मंदिरातील मूर्तीमधूनच बर्फासारखा गार हवेचा झोंत येतो. या ठिकाणी अनेक संशोधकांनी गार हवा येते कुठून हे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही.

येथे येणारे भाविक हा शिवशक्तीचा चमत्कार मानतात. येथे येणाऱ्या भाविकांना अलौकिक शक्तीचा अनुभव येतो असेही सांगितले जाते.

Leave a Comment