अमेझॉन आता घरपोच घालणार दुध, दह्याचे रतीब


अमेझॉनला कडवी स्पर्धा देणाऱ्या फ्लिपकार्टची खरेदी अमेरिकन रिटेल चेन वॉलमार्टने केल्यानंतर अधिक दक्ष झालेल्या अमेझॉन या ईकॉमर्स साईटने ग्रोसरी विभागात नवी सेवा सुरु केली असून सध्या ती फक्त प्राईम मेम्बर्स साठी आहे. प्राईम मेम्बर्स साठी अमेझॉन अल्ट्रा फास्ट डिलिव्हरी देणार आहे. यात ग्राहक त्याच्या उपयोगाचे कोणतेही सामान मागवू शकेल. सकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत दुध, दही, पनीर अश्या नाशवंत मालाची डिलिव्हरी केवळ दोन तासात घरपोच केली जाणार आहे.

प्राईम नाऊ या नावाने सुरु झालेली हे सेवा सध्या मोबाईल अॅप साठी आहे. त्यात १० हजार उत्पादनांचा समावेश असून नव्या विभागात किचन आणि घरासाठी लागणारे सर्व सामान आहे. शिवाय किराणा मालावर ३० टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. बंगलोर, मुंबई, दिल्ली आणि हैद्राबाद शहरात हि सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Comment