सरकारी अधिकाऱ्याने बनविला जगातील सर्वात मोठा सुरा


राजस्थानच्या राज्य प्रशासन विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी पंकज ओझा यांनी गीनीज बुक ऑफ रेकोर्ड मध्ये स्वतःचे नाव कोरले आहे. ओझा यांनी त्याच्या जबाबदारीच्या कामाचा सर्व व्याप उत्तम प्रकारे सांभाळून जगातील सर्वात मोठा चाकू किंवा सुरा बनविला आहे. रोजच्या दिनक्रमातून वेळ काढून काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासातून त्यांनी हा चाकू बनविला आणि त्याची नोंद गीनीज बुक मध्ये जगातील सर्वात मोठा चाकू अशी झाली. या पूर्वी हे रेकोर्ड पोर्तुगालच्या नावावर होते. आता ते भारताच्या नावावर झाले आहे.

पोर्तुगाल मध्ये बनविला गेलेला चाकू ११.०६ फुट लांबीचा होता तर ओझा यांनी बनविलेला चाकू १७.०३ फुट लांब आणि ८ फुट रुंद आहे. त्याचे वजन ४५ किलो आहे. हा चाकू नुसता उचलणेही कठीण आहे मग त्याला धार लावण्याची बात अलगच. पण हे आव्हानही ओझा यांनी पेलले आणि चाकुला धार लावायचे कामही जिद्दीने पूर्ण केले.

ओझा हा चाकू बनविण्यामागची भूमिका सांगताना म्हणाले, समाजात जे काही वाईट आहे ते मुळापासून छाटून टाकले पाहिजे याचे प्रतिक म्हणून हा चाकू बनविला आहे.