आजपासून दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप


नवी दिल्ली – आजपासून दोन दिवस देशभरातील राज्य सरकारच्या २०, १२ खासगी तर ७ विदेशी बँकेतील कर्मचारी संपावर जाणार असून कोट्यावधी बँक ग्राहकांना या संपामुळे फटका बसणार आहे. एटीएमवर बँकिंग व्यवस्थेचा ताण येणार असल्याने एटीएममध्ये खडखडाट होण्याची शक्यता असल्यामुळे महिन्याच्या शेवटी ग्राहकांच्या मनस्तापात भर पडणार आहे.

यंदा कर्मचारी व अधिकाऱ्यांची केवळ २ टक्के पगार वाढ होणार असल्याचे इंडियन बँक असोसिएशनने (IBA) जाहीर केले आहे. ऑल इंडिया बँक एम्लॉईज असोसिएशनने (AIBEA) याला विरोध करत संपाचे हत्यार उपसले आहे. केवळ २ टक्के पगार वाढ ही बाब अत्यंत तिरस्करणीय असल्याचे एआयबीईए संघटनेने म्हटले आहे. पुरेशी पगार आयबीएने वाढ करावी, त्यानंतर आम्ही चर्चा करू, असे संघटनेचे महासचिव सी एच वेंकटचेलम यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांना आयबीएने पगारवाढीबाबतच्या चर्चेतून वगळण्याचा निर्णय घेतल्यानेही एआयबीईएने नाराजी व्यक्त केली आहे. पारदर्शी अशी ही पगारवाढ व्हावी, अशी अपेक्षा एआयबीईएने व्यक्त केली आहे. आयसीआयसीआय बँक, एचएफडीसी बँक व अॅक्सीस बँकेचे अधिकारी-कर्मचारी या संघटनेशी संलग्न नसल्याने या बँकांच्या ग्राहकांवर संपाचा प्रभाव जाणवणार नाही. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँकेच्या ग्राहकांना दोन दिवस अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Comment