आपल्या आहारात भेंडी असावीच


आपल्याकडे होत असणाऱ्या अनेक भाज्यांमध्ये बटाट्यानंतर बहुतेक भेंडी जास्त आवडीने खाल्ली जाते. ही एक अशी भाजी आहे, जी बहुतेक सर्वच घरांमध्ये बनविली जात असते. ही भाजी चटकन शिजणारी आणि त्यामध्ये कोणते ठराविक मसालेच हवेत असा आग्रह न धरणारी भाजी आहे. आपण घालू ते मसाले, किंवा साधे तिखट मीठ जरी घातले तरी अतिशय चविष्ट लागणारी अशी ही ‘युजर फ्रेंडली’ भाजी आहे. पण ही भाजी केवळ चवीलाच चांगली आहे असे नाही, तर ह्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.

भेंडीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. ह्यामध्ये कॅल्शियम,लोह, झिंक, पोटॅशियम, प्रथिने,फायबर, सोडियम, कॉपर आणि अनेक तऱ्हेची अँटी ऑक्सिडंटस् आहेत. ही सर्व तत्वे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे भेंडीचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले गेले आहे. तसे पाहिले, तर भेंडी ही भाजी वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असणारी भाजी आहे. पण ही भाजी जास्त चविष्ट लागते, ती उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. उन्हाळ्यामध्ये अत्यधिक उष्णतेने सतत थकवा जाणवतो. ह्याचे कारण हे की ह्या दिवसांमध्ये रक्तातील लॅक्टीक अॅसिड आणि अन्य रसायनांच्या पातळीमध्ये वाढ होते. भेंडी मध्ये असलेली पोषक तत्वे ह्या पातळी नियंत्रणाखाली ठेवण्यास सहायक आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भेंडीच्या सेवनाने शारीरिक थकवा कमी जाणवतो.

आजकालच्या प्रगत जीवनशैलीमुळे उत्पन्न झालेल्या अनेक विकारांमध्ये लठ्ठपणा हा विकार फार मोठ्या प्रमाणात, अगदी लहानांपासून ते वयस्क मंडळींपर्यंत सर्वांमध्ये आढळून येत आहे. भेंडीचे नियमित सेवन वजन घटविण्याच्या कामी सहायक आहे. भेंडी मध्ये डायटरी फायबर्स असल्याने ह्याच्या सेवनाने अधिक वेळ पर्यंत पोट भरलेले राहते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीजचे सेवन आपोआपच टाळले जाते. तसेच भेंडीमध्ये असलेली तत्वे शरीरातील कोलेस्टेरोल नियंत्रित ठेवणारी आहेत. भेंडीमध्ये फॅटस् अजिबात नसल्यामुळे भेंडी वजन नियंत्रित ठेवण्यास सहायक आहे. शरीराचा मेटाबोलिक रेट उत्तम ठेवण्यासही भेंडी सहायक आहे. तसेच ज्यांना मधुमेहाचा विकार आहे त्यांनी एक ते दोन भेंड्या चिरून एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये घालून ठेवून काही तासांनी ह्या पाण्याचे सेवन करावे, त्यामुळे रक्तातील ब्लडशुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.

भेंडीमध्ये असलेले फोलिक अॅसिड गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी अतिशय लाभकारी आहे. तसेह ह्यामध्ये असलेली कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह इत्यादी तत्वे शरीरातील फ्री रॅडीकल्स कमी करून शरीराची रोग्प्रतीकाशाकी कमी करण्यास सहायक आहेत. भेंडीमध्ये लोह आहे, त्यामुळे अनिमियाच्या रुग्णांसाठी ह्या भाजीचे सेवन लाभकारी आहे. तसेच पचनेन्द्रीयांमध्ये साठून राहिलेले घातक पदार्थ काढून टाकण्याचे काम भेंडी करीत असते. त्यामुळे भेंडी पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठ दूर करण्यासही सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment