येतेय स्वदेशी इलेक्ट्रिक सुपरबाईक – मानकामे ईपी १


बंगलोर येथील एका स्टार्टअप कंपनीने, मानकामे ऑटोमोटीव्हने देशात भविष्यात अधिक मागणी येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगात पाउल टाकताना एक इलेक्ट्रिक सुपरबाईक तयार केली असून तिचे नामकरण मानकामे ईपी १ असे केले आहे. इंधनावर चालणाऱ्या कोणत्याची सुपरबाईकला हि बाईक मागे टाकेल अशी खात्री व्यक्त केली जात असून ही सुपरबाईक धारवाड येथील कारखान्यात तयार झाली आहे.

मानकामे ईपी १ एकदा चार्ज केली कि ५०० किमीचे अंतर कापेल. या बाईकचा टॉप स्पीड ताशी १८० किमी असून स्पोर्ट मोड मध्ये हाच वेग ताशी १८० तर रेस मोड मध्ये तो ताशी २५१ किमी असेल. या बाईकला १८.४ केडब्ल्यूएच ची लिक्विड कुल बॅटरी मॅट्रिक्स बीएमएस सह दिली गेली आहे. याच्या सहाय्याने बाईक मॉनिटर करता येथे आणि कंट्रोल करता येते. स्पीड कंट्रोल साठी एबीएस फिचर असून फ्रंट आणि रिअर व्हीलमध्ये पॉवर ब्रेक दिले गेले आहेत. ४० के डब्ल्यू हाय परफोर्मंस मोटार दिली गेली आहे.

Leave a Comment