कोकाकोलाचे अल्कोहोलमिश्रित पेय अल्कोपॉप जपानमध्ये लाँच


शीतपेये क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोकाकोलाने सोमवारी त्यांच्या १२५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अल्कोहोलबेस्ड ड्रिंक बाजारात आणले असून ते सध्या फक्त जपान मध्ये लाँच केले आहे. अल्कोपॉप या नावाने आलेले लिंबूफ्लेवर मधील हे ड्रिंक महिला वर्गाला टार्गेट करण्यासाठी आणले गेले आहे असे समजते. या निमित्ताने कंपनीने नवा बाजार आणि नवा ग्राहक मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

जपानमध्ये विशेषतः महिला वर्गात चू हि ड्रिंक खूपच लोकप्रिय आहे. यात फळांच्या रसात अल्कोहोल मिसळलेली असते. बिअरला पर्याय म्हणून हे पेय विकले जाते. संत्रे, द्राक्ष आणि लिंबू या स्वादात ते मिळते. कोकाकोलाने याच धर्तीवर लिंबू स्वादात अल्कोपॉप नावाने नवे पेय सादर केले असून त्यात ३ ते ८ टक्के अल्कोहोल आहे.

Leave a Comment