अयोध्याच पण थायलंड मधली


आपल्याला अयोध्या म्हटले कि रामाची नगरी अयोध्या आठवते. पण थायलंडमध्येही याच नावाचे एक प्राचीन स्थळ असून ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अयोध्या याचा अर्थ अपराजित योद्धा. विशेष म्हणजे थायलंड मध्येही प्राचीन काळी हिंदू राज्य होते आणि रामायण हे तेथील महाकाव्य असून शाळेच्या पुस्तकात ते शिकविले जाते. आजही तेथे रामायणातील कथा नाट्यरूपाने सादर केल्या जातात.


असे सांगतात कि थायलंड म्हणजे पूर्वीचा सयाम देशात सर्वप्रथम बाहेरून भारतातील तमिळ व्यापारी गेले आणि त्यांनी तेथे रामायण नेले. १ ल्या शतकातच तेथे रामायण पोहोचले होते. १३६० साली राजा रामठी बोधी याने बौद्ध धर्म शासकीय धर्म म्हणून लागू केला पण त्याचवेळी तेथील प्राचीन हिंदू धर्माविषयी काही दस्तऐवज हाती आल्यानंतर पुन्हा हिंदू धर्माला मान्यता दिली गेली.


अयोध्या आज बुद्धाचे स्थान असले तरी येथे प्राचीन मंदिरांचे प्रचंड अवशेष आहेत. हि मंदिरे पुन्हा होती त्याप्रकारे उभारली जात आहेत. या ठिकाणी दरवर्षी १० लाख पर्यटक भेट देतात. येथे मठ, आश्रम, कळावे आहेत. तीन छेदी भवन हे येथील प्रमुख आकर्षण असून प्रचंड मोठी बुद्ध प्रतिमा येथे पाहायला मिळते. युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा यादी मध्ये समाविष्ट केले आहे.

Leave a Comment