फॉक्सवॅगन ८१ वर्षांची झाली


जर्मन ऑटो कंपनी फॉक्सवॅगन ने २८ मे रोजी त्याच्या उद्योगाची ८१ वर्षे पूर्ण केली असून २८ मे १९३७ ला सुरु झालेल्या या कंपनीचे कनेक्शन थेट जर्मनीचा हुकुमशाह हिटलरशी आहे याची अनेकांना माहिती नसेल. अडोल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली हि कंपनी सुरु झाली आणि पाहता पाहता तिने अमाप यश मिळविले. आज या कंपनी ग्रुप मध्ये १२ कार ब्रांड असून त्यात जगात क्रेझ असलेल्या ऑडी, पोर्शे, स्कोडा, बेंटली, लोम्बार्गिनी या कंपन्याच्या समावेश आहे.


फॉक्सवॅगन सुरु झाली त्यानंतर हिटलरने या कंपनीचा कारखाना आणि कामगार याच्यासाठी स्वतंत्र शहर बनविले. हिटलरच्या ओरिजिनल बीटल कारची चर्चा नेहमीच होत राहिली. २० व्या शतकात अनेक वर्षे बेस्ट सेलिंग कार म्हणून आघाडीवर असलेली बीटल २००३ मध्ये बंद झाली पण तोपर्यंत कंपनीने २ कोटी १५ लाख गाड्या विकल्या होत्या.

आकडेवारी सांगते जर्मनीत विकल्या जात असलेल्या प्रत्येक ३ कार मागे एक या ग्रुपची असते आणि त्याचा मार्केट शेअर ३६ टक्के आहे. जगात दरवर्षी विकल्या जाणारया प्रत्येक १० कार मध्ये एक फॉक्सवॅगनची आहे आणि त्यातील सात जर्मनी बाहेर विकल्या जातात. या कंपनीमुळे जर्मनीला मोठा महसूल मिळतो मात्र एमिशन स्कँडल मुळे या कंपनीच्या टॉप पोझिशनला धोका निर्माण झाल्याचे जाणकार सांगतात.

२०१४ पर्यंत या कंपनीत जगभरात ६ लाख कर्मचारी होते आणि त्यातील २ लाख ७० हजार एकट्या जर्मनीत काम करतात.

Leave a Comment