अंबानींची श्रीमंती मोरपंखी झुडपांमुळे?


आपलेही अलिशान घर असावे, महागड्या गाड्या तैनातीला असाव्यात, राजाराणी सारखे आयुष्य आपणही जगावे असे कोणाला वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही. प्रत्यक्षात नाही पण अनेकजण असे आयुष्य स्वप्नातही जगतात. भरपूर कष्ट केले कि पैसा मिळतो, तो हुशारीने गुंतवला तर वाढतो हे खरे असले तरी त्याला नशिबाची साथ लागते. ज्योतिष शास्त्र मात्र अमुक अमुक प्रकारचे झाड घरात लावले तर पैशांची कमतरता राहत नाही असे सांगते. विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत आणि बडे उद्योजक मुकेश अंबानी याच्या घरात असे झाड लावले गेले आहे असेही सांगितले जाते.


हे झाड म्हणजे एक प्रकारचे झुडूप असून त्याला मोरपंखी म्हणतात. आजकाल सजावटीसाठी अनेक प्रकारची झाडे, वेळी, रोपटी घरात लावली जातात. हे मोरपंखी झाड मात्र घरात नाही तर घराच्या मुख्य दारात लावायचे आणि ते जोडीने म्हणजे नवराबायको जोडीने नव्हे तर झाडाची दोन रोपे दोन बाजूला असे लावायचे असे म्हणतात. या झुडपामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवेश घरात होत नाही, घरावर संकटे येत नाहीत आणि पैशांची कधीच तंगी येत नाही असे म्हणतात. पैसा मिळवायचा हा अगदी सोपा उपाय तुम्ही करून बघणार का? वास्तविक यात अंधश्रद्धा किती आणि सत्य किती याचा अनुभव त्याचा त्याने घ्यायचा आहे.

Leave a Comment