इजिप्तच्या उच्च न्यायालयाची यु-ट्यूबवर तात्पुरती बंदी


कैरो- इजिप्तच्या उच्च न्यायालयाने व्हिडीओ शेअरींग साईट यु ट्यूब वर मंहमंद पैंगबरांची बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. हा निर्णय अंतिम असून या विरोधात अपिल करता येणार नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

मुस्लिम देशांमध्ये अमेरिकेविरोधात २०१२ मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. कॅलिफोर्नियास्थित एका खासगी ग्रुपने त्या दरम्यान पैसा पुरवून मंहमंद पैंगबराची बदनामी करणारे १३ मिनिटाचे व्हिडिओ बनवले होते. इजिप्शियन वकील मंहमद हमीद सालेम यांनी या विरोधात यु ट्यूब विरोधात याचिका दाखल केली होती.

सालेम यांनी सांगितले, की त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी देखील आदेश दिला होता की त्या फिल्मच्या सर्व लिंक लवकरात लवकर ब्लॅाक करण्यात याव्यात, तसेच २०१३ साली स्थानिक न्यायालयानेही माहिती प्रसारण व तंत्रज्ञान मंत्रालयाला पैंगबरांच्या बदनामीचे व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे यु ट्यूब वर एका महिन्यासाठी बंदी घालावी असा आदेश दिला होता.

दरम्यान अशी बंदी लागू करणे अंत्यत कठिण असल्याचे माहिती प्रसारण व तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले. या उलट अशा कारवाईने गुगल इजिप्तमधील इंटरनेट सर्च इंजिनमध्ये अडथळा निर्माण करेल ज्यामुळे इजिप्तमधील नोकऱ्या जाण्याचे संकट उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment