भारतात लवकरच येतेय बीएमडब्ल्यूची आय ३ एस ई कार


बीएमडब्ल्यू या जर्मन अलिशान कार उत्पादक कंपनीने आता भारतातील श्रीमंत ग्राहकांवर अधिक लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी खास योजना आखली आहे. त्यानुसार कंपनी लवकरच त्याची आय ३ एस इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार असल्याचे समजते. ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ती शोकेस केली गेली होती. या कारची किंमत साधारण ४५ ते ५० लाख रुपये असेल असेही सांगितले जात आहे.

या कारला ३३.२ केडब्ल्यूएच ची लिथियम आयन बॅटरी दिली गेली असून फुल चार्ज मध्ये हि कार २०० किमी अंतर कापते. बॅटरी स्टँडर्ड एसी चार्जरने चार्ज करता येथे. यासाठी ११ तास लागतात मात्र कंपनीकडून दिल्या जाणार्या बीएमडब्ल्यू वॉल बॉक्स चार्जर मुले २.४५ मिनिटात कारची बॅटरी ८० टक्के चार्ज होते. ६.७ सेकंदात हि कार ० ते १०० किमीचा वेग पकडते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी १६० किमी. या कारला स्पोर्टी लुक दिला गेला असून फ्रंट आणि रिअर बम्पर चंकी बनविले गेले आहेत. त्यावर ब्लॅक फ्लॅशेस सर्वत्र उठून दिसत आहेत.

Leave a Comment