सीटी स्कॅनर, एमआरआय मशीनसाठी गुणवत्ता मानके सरकार ठरविणार


आजकाल रोगनिदान करताना महत्वाच्या चाचण्या करण्यासाठी वापरली जाणारी सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, पेसमेकर्स, पीईटी या आणि अश्या मेडिकल उपकरणांची गुणवत्ता खात्री ठरविण्यासाठी सरकार लवकरच मानके ठरविणार आहे. यासाठी ड्रग टेक्नीकल अॅडव्हायझरी बोर्डने १६ मे रोजी झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्यारोपण अथवा अन्य महागड्या उपचारांसाठी वापरली जाणारी मेडिकल उपकरणे ड्रग्स अँड कोस्मेटिक अॅक्ट १९४० मध्ये बदल केला जात आहे.

या बदलामुळे मेडिकल उपकरणे कोणत्या गुणवत्तेची हवीत याची मानके ठरविणे सुलभ होणार आहे. डायलिसीस, एक्सरे, पीईटी, सिटी, एमआरआय तपासण्या करताना त्यामुळे रुग्णाला सुरक्षेची हमी मिळेल, या तपासण्यांची गुणवत्ता वाढेल आणि मानके निश्चित झाल्याने स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल तसेच या उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment