केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यास सकारात्मक


नवी दिल्ली – दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच असून केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इंधनाच्या वाढत्या किमती रोखण्याच्या हेतूने, ते जीएसटी अंतर्गत आणणार असल्याचे म्हटले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले, वस्तू आणि सेवा करांतर्गत (जीएसटी) पेट्रोल आणि डिझेल आणल्यास राज्यांना त्याचा फायदा होईल. तसेच, असे करण्याचा निर्णय जीएसटी काउंसीलने घेतला, तर केंद्र या निर्णयाचे स्वागतच करेल, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

गडकरी म्हणाले, जीएसटी अंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणल्यास राज्यांना याचा फायदा होईल का ? असे मी एका प्रेझेंटेशनच्या वेळी अधिकाऱ्यांनी विचारले. त्यांनी यावर ‘हो’ राज्यांना याचा फायदा होईल, असे उत्तर दिले. मोदी सरकारचे चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोयल यावर बोलताना म्हणाले, ईंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतीत असून ते जीएसटी अंतर्गत आण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment