ह्युंदाईच्या i20 कारचे सीव्हीटी मॉडल लॉन्च


मुंबई : आपल्या i20 कारचे सीव्हीटी मॉडल ह्युंदाई कंपनीने भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. या गाडीचे ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.

ह्युंदाईने नव्या i20 ऑटोमॅटिकसोबत आपल्या प्रतिस्पर्धी मारुती सुजुकी बलेनो आणि होंडा जॅजला टक्कर दिली आहे. ऑटो एक्सपोमध्येही ह्युंदाईची ही नवी कार लॉन्च करण्यात आली होती. या कारच्या पेट्रोल ऑटोमॅटिक वेरिएंटमध्ये मॅन्युअल वर्जन असलेल्या सर्व वैशिष्ट्ये आहेत.

२०१८ ह्युंदाई पेट्रोल ऑटोमॅटिकच्या सीव्हीटी वर्जनमध्ये १.२ लीटर, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८३ बीएचपीचे पावर जनरेट करते. त्याचबरोबर रिवाइज्ड बंपर, स्मोक्ड हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. तसेच ऑस्ट्रा ट्रिममध्ये डायमंड कट अलॉय व्हिल्ज, एलईडी टेललाईट्स आणि ड्यूअल टोन बंपर देण्यात आले आहे. तसेच नवी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. त्याचबरोबर कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी देण्यात आले आहेत.

याच महिन्यात i20च्या सीव्हीटी वेरिएंटची बुकिंग सुरु झाली असून ग्राहकांना या गाडीची डिलिव्हरी महिन्याच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ह्युंदाईच्या i20 सीव्हीटीची सुरुवाती किंमत ७.४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ऐस्टा वेरियंटची किंमत ८.१ लाख रुपये आहे.

Leave a Comment