ही आहे भारतातली काचेसारखी स्वच्छ नदी


परदेशातील सारे काही देखणे, स्वच्छ अशी आपली भाबडी समजूत असते. पण आपल्या देशातही काही ठिकाणे अशी आहेत जेथे स्वच्छतेच्या साऱ्या कल्पना मूर्त स्वरुपात दिसतात. मेघालय राज्याची राजधानी शिलॉंग पासून अवघ्या ८५ किमीवर असणारया भारत बांग्ला देशाच्या सीमेवर असलेसी जयंतिया हिल्स जिल्ह्यातील दावाकी या छोट्या गावातील उम्नगोत नदी त्यासाठी आवर्जून पाहायला हवी.


खरेतर भारतबांग्ला देशातील व्यस्त व्यापार मार्गावरची ही नदी. शेकडो ट्रक्स रोज येथून येजा करतात. तरीही ही नदी अतिस्वच्छ राखली गेली आहे. या नदीत मासे भरपूर प्रमाणात सापडतात आणि मासेमारी करणारे अनेक मच्छीमार या नदीवर त्याची गुजराण करतात. या नदीत बोटिंग करताना जणू आपण नितळ स्वच्छ काचेवरून जात आहोत असा भास होतो. इतकी स्वच्छ नदी भारतात आहे यावर अगोदर विश्वास बसत नाही. या नदीत कणभरहि कचरा दिसणार नाही. कुणी त्याकाण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड केला जातो. ब्रिटिशानि या नदीवर एक पूल बांधला आहे.

या नदीची सैर हिवाळ्यात आणखी सुंदर होते. पण येथे जाण्यासाठी योग्य काळ फेब्रुवारी ते एप्रिल हा आहे. तेव्हा एकदा तरी अवश्य हि काचेसारखी चमकणारी, तळातील दगड गोटे आणि मासे स्पष्ट दाखविणारी नदी पाहून यायला हवी.

Leave a Comment