अमेरिकेत सोने विक्री वाढण्यामागे मेगन मर्केल कारण


अमेरिकेत २०१८ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या खरेदीत प्रचंड तेजी आली असून हि तेजी ब्रिटीश राजघराण्याची नवी सून आणि माजी अभिनेत्री मेगन मर्केल कारण असल्याचे समजते. मेगानला सोन्याची खूप आवड आहे आणि तिने वेडिंग रिंग सोन्याची केली होती. तेव्हापासून सोने दागिन्यांना मागणी वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेत दागिने खरेदी करताना तेथील २२ टक्के महिला मासिके वर्तमानपत्रातील जाहिराती वाचून आणि ११ टक्के महिला सेलेब्रिटी फॅशन पाहून खरेदी करतात असे सर्व्हेक्षण सांगते. गेली १५ वर्षे तेथे व्हाईट गोल्ड, प्लॅटीनम, चांदीला अधिक मागणी होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या निरीक्षणनुसार मेगन आणि हॅरी यांचा साखरपुडा १७ नोव्हेंबरला झाला आणि लग्न १९ मे ला झाले या काळात अमेरिकेत सोन्याच्या दागिने खरेदीत ३० टक्के वाढ दिसली आहे. २००९ नंतर प्रथमच २०१८ च्या पहिल्या तिमाहीत इतकी वाढ नोंदवली गेली आहे.

Leave a Comment