मोदींनी स्वीकारले विराटचे फिटनेस चॅलेंज


मंगळवारी केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सुरु केलेल्या फिटनेस चॅलेंजची पुढची कडी सुरु झाली असून राठोड यांनी दिलेले चॅलेंज पूर्ण करून विराट कोहलीने पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले होते. मोदींनी विराटचे चॅलेंज स्वीकारले असून लवकरच त्याच्या फिटनेसचा खास व्हिडीओ शेअर करेन असे आश्वासन दिले आहे.

हे चॅलेंज स्वीकारतान मोदींनी ट्विटरवरून विराटला चॅलेंज मंजूर विराट अशी पोस्ट टाकली आहे. विराटने त्याचे चॅलेंज पूर्ण करताना पत्नी अनुष्का, मोदी आणि धोनी यांना आव्हान दिले होते. पैकी मोदी आणि अनुष्काने हे आव्हान स्वीकारले आहे. राठोड सरांचे आव्हान स्वीकारून साईना नेहवाल ने सिंधूला टॅग केले होते तिनेही हे चॅलेंज पूर्ण केले आहे. देशभरात फिटनेस बाबत जागृती व्हावी यासाठी ही मोहीम राज्यवर्धन राठोड यांनी मोदींकडून प्रेरणा घेऊन सुरु केली आहे.

Leave a Comment