जिओच्या फिचरफोनने रचला इतिहास


नवी दिल्ली- रिलायन्स जिओचा फोन २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून समोर आला असून याबाबत काऊंटर पॉइंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, २०१८च्या पहिल्याच तिमाहीत जिओ फोनने जागतिक बाजारातील जवळपास १५ टक्के हिस्सा स्वतःच्या नावे केला आहे. तर एचएमडी ग्लोबल (नोकिया) १४ टक्के शेअर्ससह दुस-या स्थानी असून १३ टक्क्यांसह आयटेलने तिसरे स्थान मिळवलं आहे. बाजारातील जवळपास ६ टक्के हिस्सा सॅमसंग आणि टेक्नोच्या फीचर्स फोनने मिळवला आहे. जिओ फोनने भारतात वर्षभरातच एक नवी उंची गाठली आहे.

दरम्यान जिओ फोन नंबर १ ब्रँड असल्याचेही समोर आले होते. यावर आता काऊंटर पॉइंटने शिक्कामोर्तब केले आहे. या फोनच्या जागतिक स्तरावरील बाजारात वर्ष २०१८च्या पहिल्या तिमाहीत ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिओ फोन आणि नोकिया एचएमडी फोनमुळे जागतिक बाजाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. जिओफोन ग्राहकांना अवघ्या १५०० रुपयांचे डिपॉजिट घेऊन सादर करण्यात आला. हे पैसे युजरला तीन वर्षांनंतर परत मिळणार असल्यामुळे हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहेत.

Leave a Comment