कैलासतीर्थ पाण्याची चव चाखलीत का?


देशविदेशात लेखक, संत आणि योगी म्हणून प्रसिद्ध असलेले जग्गी वासुदेव याच्या ईशा फौंडेशनने कैलास तीर्थ नावाने पिण्याच्या पाण्याची बाटली बाजारात आणली असून या पाण्याच्या एक लिटर बाटलीची किंमत आहे ३१०० रुपये. तांब्यापासून बनविलेल्या या बाटलीला आतून चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. या पाण्याचे वर्णन सुपरवॉटर असे केले गेले आहे.

सोशल मिडीयावर या कैलास तीर्थाची चांगलीच चर्चा होत आहे. हे पाणी पिणे म्हणजे साक्षात कैलास दर्शन घेणे आहे असे सांगितले जात आहे. हे पाणी इतके शुद्ध आणि पवित्र आहे कि ते पोटात जाताच शरीरात अनोख्या उर्जेचा संचार होतो. हिमालयातील कैलास पर्वताच्या मुखातून हे पाणी आणले गेल्याचे समजते. या पाण्यात दिव्य शक्ती आहेत आणि त्यामुळे स्मरणशक्ती आणि उर्जा वाढते असे म्हणतात.

बाटलीला आतून चांदीचा मुलामा असल्याने चांदीचे गुण या पाण्यात आहेत. आयुर्वेदानुसार चांदीच्या भांड्यात पाणी ठेवले तर त्यात अँटी बॅक्टेरीअल गुण येतात. असे पाणी शरीरसाठी अमृतासमान असते असेही सांगितले जाते.

Leave a Comment