अवघ्या १० मिनिटांत विकले गेले वनप्लस ६चे २५ हजार मॉडेल


आपला स्मार्टफोन वनप्लस ६ भारतात वनप्लस कंपनीने लॉन्च केला. तो २१ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉनवर कंपनीच्या प्राईम मेंबरसाठी तर सर्व ग्राहकांसाठी हा फोन २२ मे रोजी खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. ग्राहकांच्या या स्मार्टफोनवर अक्षरश: उड्या पडल्या असून कंपनीने अवघ्या १० मिनिटांत कित्येक कोटींची कमाई केली आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनचा सेल सुरु झाल्यानंतर २५ हजार मॉडेल अवघ्या १० मिनिटांत विकली गेली.

कंपनीचे भारतातील महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी अवघ्या १० मिनिटांत कंपनीने एवढी कमाई केली ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे सांगितले. मिरर ब्लॅक कलरच्या फोनला यामध्येही मिडनाईट ब्लॅक रंगाच्या तुलनेत जास्त मागणी असल्याचेही ते म्हणाले. या फोनमध्ये आयफोन X प्रमाणे विशेष नॉच देण्यात आलेला आहे. पण हा नॉच ज्यांना नको असेल त्यांना तो लपविता येईल अशी सुविधाही करण्यात आली आहे. वनप्लस 5T प्रमाणे या फोनला ३ कॅमेरे देण्यात आले असून २० आणि १६ मेगापिक्सलचे रिअर कॅमेरे असतील, तर फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा असेल. या फोनमध्येही जुन्या वनप्लस प्रमाणे क्वालकॉमचे सर्वात पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन देण्यात आले आहे.

Leave a Comment