नासाचे सूर्ययान सोबत नेणार ११ लाख लोकांची नावे


अमेरिकन अंतराळ संस्था नासा सूर्याच्या अगदी जवळ पाठविणार असलेल्या पार्कर यानांतून ११ लाख ३७ हजार २०२ लोकांची नावे पाठविणार आहे. सात वर्षांच्या या मोहिमेत पार्कर सोलर प्रोब यान २४ वेळा सूर्याच्या वातावरणाच्या अगदी जवळून जाणार आहे. यापूर्वी कोणतेच यान सूर्याच्या इतक्या जवळून गेलेले नाही. या यानामुळे सुर्यासंबंधीची महत्वपूर्ण माहिती हाती येईल असे शास्त्रज्ञ निकोल फॉक्स यांनी सांगितले.

नासाची ही आजपर्यंतची सर्वात अवघड मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची नवे नासाने गेल्या मार्चमध्ये मागविली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ११ लाखाहून अधिक लोकांनी त्यांची नावे पाठविली. या नावांचे एक मेमरी कार्ड बनवून ते यानात १८ मे रोजी लावले गेले आहे. याच कार्डमध्ये शिकागो विद्यापीठ मधील सोलर विंड या विषयावर महत्वाचे संशोधन करणारे महान शास्त्रज्ञ ड्युजेन पार्कर यांचे चित्र आणि संशोधन प्रत लावली गेली आहे. याच संशोदाकाचे नाव यानाला दिले गेले असून नासाच्या इतिहासत प्रथमच हयात व्यक्तीचे नाव यानाला दिले गेले आहे.

Leave a Comment