अशी आहे इंडिअन आर्मीची टाटा सफारी स्टॉर्म


देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सने खास इंडिअन आर्मीसाठी बनविलेल्या टाटा सफारी स्टॉर्म गाड्यांची डिलिव्हरी सुरु केली असून या गाड्या लष्कराच्या खास गरजा लक्षात घेऊन बनविल्या गेल्या आहेत. अश्या ३१९२ गाड्या लष्कराला दिल्या जाणार असून महिंद्र आणि निस्सान या कंपन्यांकडूनही आर्मी काही गाड्या खरेदी करणार आहे.

टाटा सफारी स्टॉर्म ने लष्कराच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार या गाड्या ८०० किलो वजन सहज वाहून नेऊ शकतील. या गाड्यांना हार्ड टॉप रुफ, एसी दिले गेले आहेत तसेच या सर्व गाड्या मॅट ग्रीन कलर मध्ये आहेत. हेडलँप प्रोजेक्ट मध्ये प्रकाशाचा समांतर बीम असून त्यामुळे रात्री शत्रू या गाड्या सहजी पाहू शकणार नाही. रिअरमध्ये दिलेल्या हुक मुळे गरज निर्माण झाल्यास गाडी टो करता येणार आहे. या गाडीला रेडीओ साठी अँटेना दिली गेली आहे तसेच अंडरबॉडी प्रोटेक्शन सह अपरेटेड सस्पेन्शन आहे. व्हीलबेस छोटा आहे मात्र ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे.

या गाडीला नेहमीच्या स्टॅर्म सफारी प्रमाणेच २.२ लिटरचे टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन असून ६ स्पीड मन्युअल गिअर बॉक्स दिली गेली आहे.

Leave a Comment