पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असून कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलने महाराष्ट्रात ८६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात असून मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर ८५ रुपये तर डिझेलला दर ७२ रुपये ६६ पैसे एवढा आहे.

सर्वसामान्य या सततच्या दरवाढीमुळे हैराण झाले असून त्यांचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग दहाव्या दिवशी ३० पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या बैठकीत इंधन दरवाढीबाबत तोडगा काढणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment