पेट्रोल दरात २५ रूपयांची कपात करता येणे शक्य – पी. चिदंबरम


नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीवरून मोदी सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हल्लाबोल केला आहे. चिदंबरम यांनी देशातील पेट्रोलचे दर हे २५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा केले आहे. एवढी कपात करता येणे शक्य असले तरी या दिशेने सरकार पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी वाढत्या इंधन दरावर सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. २५ रूपयांपर्यंत पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. पण असे सरकार करणार नाही. ते पेट्रोलचे दर १ किंवा २ रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गत नऊ दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, प्रत्येक एक लिटरमागे केंद्र सरकार २५ रूपये जास्त घेत असून हा थेट नागरिकांचा पैसा आहे. सरकार क्रूड ऑईलच्या किमतीवर एका लिटरमागे १५ रूपये वाचवत आहे. ते त्यानंतर १० रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment