लोम्बार्गिनीची तहान भागवा डीसी अवंतीवर


जगभरात लोकप्रिय असलेली लोम्बार्गिनीची स्पोर्ट्स कार कुणालाही पाहता क्षणी प्रेमात पाडते मग तो राजा असो वा रंक. अशी कार आपल्याकडे हवी अशी इच्छा होणे त्यामुळे चुकीचे ठरत नसले तरी तिची किंमत हि इच्छा भल्याभल्यांना मारून टाकावी लागते. आपल्याकडे एक म्हण आहे, दुधाची तहान ताकावर. ती येथे आपण प्रत्यक्ष वापरू शकतो. म्हणजे लोम्बार्गिनी नाही तर तिच्या तोडीस तोड कार खरेदी करायची तीही कमी किमतीत. हि संधी आपल्या भारतीय कंपनीने ग्राहकांना दिली आहे. लोम्बार्गिनी सारखीच देखणी कार डीसी अवंती तुमच्यासाठी सज्ज आहे.

अवंतीचा लुक आणि फीचर्स सेम लोम्बार्गिनीसारखेच आहेत. मात्र लोम्बार्गिनीसाठी तुम्हाला किमान ५ कोटी मोजायला हवेत त्याऐवजी अवंती तुम्हाला ३५ ते ४० लाखात मिळू शकते. हि पहिलीच स्वदेशी स्पोर्ट्स कार आहे. २०१२च्या ऑटो एक्स्पो मध्ये ती सादर केली गेली होती. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबडीया यांनी तिचे डिझाईन केले आहे.

या कारला १९९८ सीसीचे फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन, ६ स्पीड मन्युअल गिअर बॉक्स, रिअर व्हील ड्राईव अशी फीचर्स असून ती दोन सीटर आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ७ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किमी. लाल, सफेद आणि सिल्वर कलर मध्ये ती उपलब्ध आहे.

Leave a Comment