राजा राम मोहन रॉय यांना गुगलची आदरांजली


मुंबई : आज (२२ एप्रिल) भारतात सती प्रथेविरूद्ध आवाज उठवून ती बंद करण्यासाठी सरकारला भाग पाडणारे थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची २४६वी जयंती असून इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने जयंतीचे औचित्य साधून डूडल बनवून रॉय यांच्या प्रती आपला आदर व्यक्त केला आहे. सती प्रथेविरूद्ध राजा राम मोहन रॉय यांनी आवाज तर उठवलाच. पण, त्याशिवायही समाजातील इतर अनेक अनिष्ठ गोष्टींविरोधातही मोठे कार्य केले.

गुगलचे आजचे डूडल काहीसे हटके असून बीना टोरंटोने हे डूडल डिजाईन केले आहे. डूडलमध्ये गूगलने राजा राम मोहन रॉय यांनी हाता पुस्तक घेतलेले दाखवले आहे. तसेच, त्यांच्या आजुबाजूला इतर लोकही उपस्थित असल्याचे दिसते. आधुनिक भारताच्या इतिहासात रॉय यांचे मोठे योगदान आहे. भारतावर १९व्या शतकात इंग्रजांचे राज्य होते. त्यांनी या काळातही भारतीय समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे उत्तुंग कार्य केले. ज्याचा परिणाम समाजबदलात झाला. केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध रॉय यांनी जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.

Leave a Comment