बँकॉक मधील प्रसिद्ध ब्रह्मा मंदिर


थायलंड मध्ये आजही अनेक हिंदू मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण केंद्रेही बनली आहेत. त्यातील एक आहे राजधानी बँकॉक येथील इरावन तीर्थ नावाने ओळखले जाणारे ब्रह्मा मंदिर. हे मंदिर फारसे जुने नाही तरीही ते बँकॉक मधील मुख्य धार्मिक स्थळ बनले आहे. यामागे हे मंदिर वाईट शक्तींना नियंत्रणात आणणारे असल्याच्या भाविकांचा असलेला विश्वास.

१९५६ साली या मंदिराची उभारणी झाली. या मंदिरात चारमुखी ब्रह्म देवाची सोन्याची भव्य मूर्ती आहे. वास्तविक या मंदिराची उभारणी होण्यामागे विचित्र घटना कारणीभूत आहे. १९५० साली या परिसरात इरावन नावाने एक भलेमोठे हॉटेल बांधले जात होते. पण बांधकामात वारंवार अडथळे येऊ लागले. काही मजुरांचे अपघाती मृत्यू झाले. त्यामुळे येथे वाईट शक्ती असाव्यात असा समज पसरला. मात्र हे स्थळ इतके आकर्षक होते कि जागा मालकाला सोडवेना. तेव्हा एका ज्योतिषाचा सल्ला घेतला गेला.

ज्योतिषी ताओ महाप्रोम म्हणाले येथे ब्रह्मदेवाचे मंदिर बांधा त्यानंतर हॉटेलचे बांधकाम करा. त्याप्रमणे प्रथम मंदिर बांधले गेले आणि त्यानंतर हॉटेल बांधले गेले. त्यावेळी कोणतेही अडथळे न येता काम पूर्ण झाले. त्यामुळे मंदिराचे महत्व अधिक वाढले. या मंदिराला तेव्हापासून ताओ महाप्रोम मंदिर असेही म्हटले जाते. केवळ थायलंडच नाही तर भारत आणि अन्य आशियाई देशातील पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

Leave a Comment